‘गिरीश महाजन यांना माझ्या नावाची कावीळ…’, एकनाथ खडसे यांची सडकून टीका

| Updated on: Mar 28, 2023 | 11:15 PM

VIDEO | भाजप नेते गिरीश महाजन यांच्या 'त्या' टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आक्रमक, बघा काय केली टीका

मुंबई : येत्या दोन ते तीन दिवसात मंदाकिनी खडसे आणि संबंधित व्यक्तींवर दूध फेडरेशन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल होणार असल्याचं भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर खडसे म्हणाले, “गिरीश महाजन यांना माझ्या कावीळ झालाय. गिरीश महाजन यांना दिवस-रात्र फक्त एकनाथ खडसेच दिसतात”. “दूध फेडरेशनमध्ये गैरव्यवहार असेल तर मी स्वतः या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ती तक्रार चोरी करणाऱ्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे त्या कालखंडातले एमडी जे कोणी असतील, पण राजकीय दबावापोटी त्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नाही”, असा दावा खडसे यांनी केला. याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंद झाली नाही. मी रात्रभर त्या ठिकाणी आंदोलन आणि उपोषण केलं. हायकोर्टाच्या माध्यमातून गैरव्यवहार करणाऱ्यांना मी दिलेल्या तक्रारीवरून नोटीस देखील बजविण्यात आली आहे, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 28, 2023 11:15 PM
काँग्रेस आमदाराच्या नावानं मागितली लाच अन्…, कुठं घडला धक्कादायक प्रकार
‘मला जेलमध्ये टाकण्यासाठी जाळं टाकलं पण…’, पंतप्रधान मोदी यांचं नाव न घेता टीकास्त्र