Eknath Khadse : हृदयविकाराच्या झटक्यातून सावरल्यानंतर खडसे म्हणाले, मी परत येईल की नाही याची खात्री…

| Updated on: Nov 19, 2023 | 4:52 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे हृदयविकाराच्या झटक्यातून बरे झाल्यावर घरी परतल्यावर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर मी परत येईल की नाही याची खात्री नव्हती. मात्र मी मुक्ताईच्या आशीर्वादाने परत आलो त्याचा आनंद आहे.

जळगाव, १९ नोव्हेंबर २०२३ : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे हृदयविकाराच्या झटक्यातून बरे झाल्यावर घरी परतल्यावर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर मी परत येईल की नाही याची खात्री नव्हती. मात्र मी मुक्ताईच्या आशीर्वादाने परत आलो त्याचा आनंद आहे. एवढ्या मोठ्या संकटातून वाचल्यानंतर एकनाथ खडसे यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद होते म्हणून मी हृदयविकाराच्या झटक्यातून बरा झालो आहे, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार व्यक्त केले. तर मी जनतेच्या सेवेसाठी सिद्ध आहे. वर्षभरापासून जनतेसाठी संघर्ष करत आलोय, या संघर्षातून वेगवेगळ्या भूमिका मी बजावल्या आहेत, असे म्हणत पुन्हा नव्या उत्साहाने जनतेची काम करणार असल्याचा शब्द खडसे यांनी जनतेला दिला. यासह खडसे यांनी असेही म्हटले की, आता मला नवा जन्म मिळाल्यासारखं वाटतंय. तर अनेक कार्यकर्त्यांनी माझी भेट घेतली. या भेटीतून माझा उत्साह त्यांनी द्वीगुणित केल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

Published on: Nov 19, 2023 04:52 PM
World Cup 2023 : सोन्या-चांदीनं मढवलेल्या World Cup Trophy ची किंमत ऐकून तुम्ही व्हाल गार, बघा किती आहे किंमत?
Maratha Reservation : मराठ्यांपाठोपाठ कोणत्या जातींच्या सापडल्या कुणबी नोंदी? जिल्हाधिकाऱ्यांची मोठी माहिती काय?