Eknath Khadse | कर नाही तर डर कशाला, ईडी चौकशीला सामोरं जातोय : एकनाथ खडसे
राजकारणात कधीही कुणी माझ्याविरोधात काही बोललेलं नाही. पण जमिनीबाबत माझ्यावर हेतूपुरस्सर आरोप करण्यात आला. कोर्टानेही आरोपात तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे कर नाही तर डर कशाला? त्यामुळे ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असे खडसे म्हणाले.
जळगाव: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी माझी ईडी लावली तर सीडी बाहेर काढीन असं विधान केलं होतं. त्यानंतर खडसेंची ईडीकडून चौकशी करण्यात आली तरी त्यांनी सीडी बाहेर काढली नव्हती. त्यावरून खडसेंना डिवचण्यातही आले होते. मात्र, आता खडसेंनी पहिल्यांदाच सीडीबाबत भाष्य केलं आहे. योग्यवेळी मी सीडी लावणार आहे, असा इशाराच एकनाथ खडसे यांनी दिला आहे. गेल्या 40 वर्षात माझ्यावर एकही आक्षेप आलेला नाही. राजकारणात कधीही कुणी माझ्याविरोधात काही बोललेलं नाही. पण जमिनीबाबत माझ्यावर हेतूपुरस्सर आरोप करण्यात आला. कोर्टानेही आरोपात तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे कर नाही तर डर कशाला? त्यामुळे ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असे खडसे म्हणाले.