एकनाथ खडसे यांनी प्रकृतीची दिली माहिती, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, लवकरच मी…
गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईत उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. यानंतर आज मी लवकरच पूर्णपणे बरा होऊन सेवेत रूजू होणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
मुंबई, ९ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना गेल्या चार दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. दरम्यान, मी लवकरच पूर्णपणे बरा होऊन सेवेत रूजू होणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहतात. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
Published on: Nov 09, 2023 01:20 PM