Eknath Khadse | माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनच : एकनाथ खडसे
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्या मुलीच्या पराभवामागे महाजनच असल्याचं मला कालच समजलं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्या मुलीच्या पराभवामागे महाजनच असल्याचं मला कालच समजलं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून जुंपली आहे. आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देण्याचा हा सिलसिला सुरू असतानाच एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर नवा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे. माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनच आहे. हे मला कालच समजलं, असं सांगतानाच मी भाजपमध्ये असलेल्यांना सांगतो की, अरे भाजपवाल्यांनी माझे असे हाल केले. तुम्ही काय त्यांची हाजीहाजी करता. राष्ट्रवादीत या, असं आवाहन खडसे यांनी भाजपमधील नेत्यांना केलं.