हसन मुश्रीफ यांचे व्यवसायिक भागीदार ईडीच्या रडारवर, पुन्हा बजावलं समन्स

| Updated on: Mar 28, 2023 | 3:19 PM

VIDEO | हसन मुश्नीफ यांचे व्यावसायिक भागीदार चंद्रकांत गायकवाड यांना पुन्हा एकदा ईडीचं समन्स

पुणे : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्नीफ यांचे व्यावसायिक भागीदार चंद्रकांत गायकवाड यांना पुन्हा एकदा ईडीचं समन्स बजावण्यात आले आहे. या समन्सनुसार त्यांना ३० मार्च रोजी ईडी चैकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. चंद्रकांत गायकवाड यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे. हसन मुश्रीफ व्यावसायिक भागीदार आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे सर्वेसर्वा चंद्रकांत गायकवाड यांना आता ईडीने चौकशी चौकशीसाठी ईडीने समन्स बजावलेलं आहे. त्यांच्या नातेवाईकांनासुद्धा चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांची मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू होती. आतापर्यंत तीन वेळा चौकशीसाठी बोलवण्याच आले होते. अशातच मुश्रीफ यांच्या जवळचे जेवढे व्यावसाय़िक भागीदार आहेत त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

पाण्याविना नागरिकांचे हाल, ठाकरेगट आक्रमक; सोलापूर महापालिकेविरोधात आंदोलन
“सावरकारंवर बोलणं थांबलं नाहीतर मग महात्मा गांधीची 100 पापं आम्ही समोर आणू”