अररर…. थोडक्यात बचावले; कोल्हे, जयंत पाटील शिवरायांच्या पुतळ्याला हार घालताना झुकली क्रेन अन्.. ; बघा VIDEO

| Updated on: Aug 09, 2024 | 3:18 PM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी आपली कंबर कसली आहे. एकीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू आहे तर दुसरीकडे आजपासून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या दिवशी बघा काय घडलं?

शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला आजपासून सुरूवात झाली आहे. आज राज्यात पुन्हा रयतेचे राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी म्हटले तर ही यात्रा आज शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झाली आहे. मात्र शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही नेते थोडक्यात बचावल्याची घटना समोर आली आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या पर्वाची सुरूवात आज शिवनेरी गडावरून कऱण्यात आली या यात्रेच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी जयंत पाटील, अमोल कोल्हे, रक्षा खडसे आणि मेहबुब शेख हे क्रेनमध्ये चढले होते. पुष्पहार अर्पण करून खाली उतरत असताना अचानक क्रेनमध्ये बिघाड झाला. अर्ध्यातच क्रेन झुकली यावेळी अमोल कोल्हे आणि जयंत पाटील खाली पडण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने ते बचावले. बघा व्हिडीओ

Published on: Aug 09, 2024 03:18 PM
महायुतीच्या प्रचाराची रणनिती ठरली, ‘वर्षा’वर रात्री ११ ते दीडपर्यंत खलबतं, शिंदे, फडणवीस अन् दादांच्या बैठकीत काय झालं?
‘लाडक्या बहिणी’ची चर्चा असताना दादांनी आठवण दिली ‘लाडक्या लेकी’ची, मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत मिळणार ‘इतके’ रुपये