काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा
‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘लोकसभेचा महासंग्राम‘ या विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज आपली विशेष मुलाखत दिली. राष्ट्रवादीतील फूट, अजित पवार यांचं भाजपसोबत जाणं आणि गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केले आहे.
मुंबई, 1 मार्च 2024 : ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘लोकसभेचा महासंग्राम‘ या विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज आपली विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील फूट, अजित पवार यांचं भाजपसोबत जाणं आणि गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आधीपासून संघर्ष दिसत होता का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर जयत पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘शरद पवार आणि अजित पवार यांचा कधीच संघर्ष कधीच नव्हता. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तिकीट वाटप आम्ही केलं आमच्यात कोणताच मतभेद झाला नाही. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात कुठला संघर्ष आहे. असं कुठेच नव्हतं…’ बघा जयतं पाटली काय म्हणाले…एक्सक्लुझिव्ह मुलाखत