बच्चू कडू यांच्या ‘त्या’ विधानावर काय म्हणाले जयंत पाटील?
बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, काय म्हणाले बघा
सोलापूर : अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील २० ते १५ आमदार हे फुटणार असून ते शिंदे गट किंवा भाजपमध्ये प्रवेश करतील असे विधान बच्चू कडू यांनी केले होते. बच्चू कडू यांच्या या नव्या दाव्याने एकच चर्चा सुरू झाली आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय मला माहित नसल्याचे त्यांनी भाष्य केले. तर आता झालेली बैठक नीट झाली असून त्यात कोणताही गोंधळ झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे येणार या रोहित पवारांच्या विधानावरही जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, आम्ही पक्षीय स्तरावर कोणतीही चर्चा केलेली नाही तर स्थानिकांना विश्वासात घेऊन आम्ही राज्य पातळीवर चर्चा करणार आहोत.
Published on: Feb 10, 2023 09:16 AM