Jayant Patil यांनी थेट सांगितली आगामी काळातील ‘मविआ’ची रणनीती? बघा नेमकं काय म्हणाले?
VIDEO | राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी थेट सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीबद्दल.. काय आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतील आतली बातमी?
पुणे, १५ सप्टेंबर २०२३ | दिल्ली येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीची माहिती समोर येत असताना आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या बैठकीतील आतली मोठी बातमी माध्यमांसमोर सांगितली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोन्ही नेते शरद पवार यांच्या घरी गेले तेव्हा जयंत पाटील देखील तेथे हजर होते. यावेळी चारही नेत्यांमध्ये बातचीत झाली. या चर्चेची माहिती जयंत पाटील यांनी दिली. महाविकास आघाडीची आगामी काळातील नेमकी रणनिती काय असणार आहे, याची थेट माहितीच जयंत पाटील यांनी दिली आहे.
तर नुकतीच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालीय याभेटीवर बोलत असताना जयंत पाटील यांनी यांच्या भेटीतील बातमीच सांगितल्याचे समोर आले आहे. जयंत पाटील म्हणाले, ‘उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोन्ही नेते शरद पवार यांना भेटले. यावेळी वज्रमूठ सभांबद्दल चर्चा झाली. वज्रमूठ सभा पुन्हा सुरु होणार असून बैठकांचं नियोजन होणार आहे. काही सभा एकत्रित वज्रमूठ सभा होतील. तर काही राष्ट्रवादी म्हणून शरद पवार यांच्या सभा होतील’