Jayant Patil : ‘मी खासगीत सांगायचो परत संधी मिळाली तर…’, जयंत पाटलांचा काय होता राहुल नार्वेकरांना सल्ला?
राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना सत्ताधारी अन् विरोधकांनी भाष्य केले. इतकंच नाहीतर विधानसभेत आज पुन्हा मिश्कील टोले, चिमटे अन् खोचक टोमणे सत्ताधारी विरोधकांनी एकमेकांना लगावल्याचे पाहायला मिळाले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सभागृहात मांडण्यात आला. यावेळी राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना सत्ताधारी अन् विरोधकांनी भाष्य केले. इतकंच नाहीतर विधानसभेत आज पुन्हा मिश्कील टोले, चिमटे अन् खोचक टोमणे सत्ताधारी विरोधकांनी एकमेकांना लगावल्याचे पाहायला मिळाले. राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या प्रस्तावावर भाषण करताना जयंत पाटील यांनी आपल्या नेहमीच्या खास शैलीत भाषण केले. यावेळी जयंत पाटील यांनी राहुल नार्वेकरांना एक सल्ला दिल्याचे त्यांनी बोलून दाखवले, जयंत पाटील म्हणाले, ‘सलग दुसऱ्यांदा तुम्ही अध्यक्ष झाला. मी तुम्हाला खासगीत सांगायचो परत संधी मिळाली तर मंत्री व्हा. मी त्यांना सारखा सल्ला द्यायचो. तुम्ही मंत्री झालेलं जास्त चांगलं होईल’ पुढे ते असेही म्हणाले, आज तिघांची भाषणे झाली. पहिल्या भाषणापेक्षा दुसरं भाषण मुख्यमंत्र्यांचं आहे का असं वाटायचं अशी वेळ आली. प्रदीर्घ मार्गदर्शन सभागृहाला झालं. सभागृहात मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. तो कुलाबा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सर्वात लहान मतदारसंघ आहे. सर्व जाती धर्माचे लोक या सभागृहात राहतात. मच्छिमार या मतदारसंघात राहतात. अतिक्रमण कसं करायचं याचा आदर्श या मतदारसंघात आहे. तुम्ही दुसऱ्यांदा निवडून आला त्याबद्दल अभिनंदन करेल, असे जयंत पाटील म्हणाले.