माझ्या मुलीसह जावयाला धमकी देणारा अधिकारी मुख्यमंत्र्याचा लाडका, जितेंद्र आव्हाड यांचा काय गंभीर आरोप?
VIDEO | जितेंद्र आव्हाड यांचे आरोप म्हणजे सनसनाटी माजवण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काय दिलं आव्हाड यांनी प्रत्युत्तर बघा व्हिडीओ
मुंबई : ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांने दाऊदच्या माणसाच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. यानंतर आव्हाड समर्थकांनी सदर अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. सदर अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांचेच अभय असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांचे आरोप म्हणजे केवळ सनसनाटी माजवण्याचा प्रयत्न आहे, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या मुलीला आणि जावयाला धमकी देणारा अधिकारी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडका आहे. एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादानेच त्याची दादागिरी सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनीच या अधिकाऱ्याला अभय दिलं आहे, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.