Jitendra Awhad Video : … म्हणून सैफ अली खान टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?

| Updated on: Jan 16, 2025 | 12:48 PM

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत यावर भाष्य केले आहे.

सलमान खान, बाबा सिद्दीकी आणि आता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत यावर भाष्य केले आहे. या हल्ल्याला धार्मिक रंग तर नाही ना? अशी शंकाही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. तर गेल्या अनेक वर्षापासून सैफ अली खानने त्याच्या मुलाचे नाव तैमुर ठेवल्यावरुन त्याला टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला असल्याचा संशयही जितेंद्र आव्हाड यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुढे ते असेही म्हणाले, ‘सैफ अली खानवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. कारण सैफ अली खानवर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे. त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते. एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मणक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता, वार हा जीवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.’, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटच्या माध्यमातून म्हटले आहे.

Published on: Jan 16, 2025 12:41 PM
Saif Ali Khan Attack Video : सैफची प्रकृती सध्या कशी? ‘लिलावती’कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
Railway Employee Local VIDEO : ट्रेन रिकामी, सीटवर पाय… विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी अन् उर्मटपणा, व्हिडीओ व्हायरल