कालीचरण महाराज यांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादी नेत्याची सडकून टीका

| Updated on: Apr 01, 2023 | 6:26 PM

VIDEO | कोल्हापूरमध्ये कालीचरण महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याची सडकून टीका

मुंबई : कोल्हापूरमध्ये कालीचरण महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह कोण बोलणार? कालीचरण महाराज? कालीचारणची लायकी काय, त्याचे शिक्षण आहे काय? देशातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे आहे. आणि त्यालाच जर कालीचरण महाराज महात्मा म्हणत असेल तर कालीचरण महाराज यांच्या बुद्धीला प्रणाम आहे, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तर महात्मा गांधी बद्दल बोलणारा कालीचरण कोण? असा स्पष्ट शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण महाराजांवर सडकून टीका केली आहे. ‘जेवढे नथुराम गोडसे वाचाल तेवढेल त्याचे भक्त व्हाल, आणि महात्मा गांधी यांचे विरोधक व्हाल. त्यामुळे नथुराम गोडसे यांनी जे केले ते योग्यच केले’, असं वादग्रस्त वक्तव्य कोल्हापूरात कालीचरण महाराज यांनी केले आहे.

Published on: Apr 01, 2023 06:26 PM
हिंदुत्व रक्तात असेल तर…, मनसे नेत्यानं शिंदे-फडणवीस सरकारला दिला इशारा
मुंबई महापालिकेचा ‘हा’ मोठा घोटाळा, त्याचा पैसा परदेशात गेला? किरीट सोमय्या यांना शंका