‘नितीन गडकरी यांना अडकवण्याचा भाजपचा डाव’, राष्ट्रवादीच्या नेत्यानं काय केला हल्लाबोल?

| Updated on: Aug 18, 2023 | 8:24 PM

VIDEO | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठीच कॅगचा अहवाल, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यानं केला भाजपवर घणाघात?

ठाणे, १८ ऑगस्ट २०२३ | कॅगच्या अहवालात केंद्रातील सहा योजनांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यांवर अधिक ताशेरे ओढण्यात आले असून या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं आहे. नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठीच कॅगचा अहवाल आला असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कॅगच्या अहवालावर भाष्य केले आहे.  जितेंद्र आव्हाड यांनी कॅगच्या अहवालावर प्रतिक्रिया देताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘मला वाटतय नितीन गडकरी यांना अडकवण्याचा भाजपचा काहीतरी डाव आहे. कारण सगळे रिपोर्ट नितीन गडकरी यांच्या खात्याशी संबंधित असून त्यांच्यावर ताशेरे मारण्यात आले आहेत. नवी दिल्लीतून अजून एका मराठी माणसाला अडचणीत आणण्याचा भाजपचा डाव आहे.’

Published on: Aug 18, 2023 08:24 PM
महिला बचत गटांसाठी मोठी बातमी, राज्य सरकारनं घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
जळगावच्या प्रसिद्ध ज्वेलर्सवर ईडीची छापेमारी का? बघा काय म्हणाले राजमल लखीचंदचे मालक?