Jitendra Awhad | कालिचरण महाराजाविरोधात गुन्हा नोंदवला : जितेंद्र आव्हाड
कालीचरण बाबाच्या संतापजनक वक्तव्याचे पडसाद राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही उमटेल. मविआ नेत्यांनी कालीचरण बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावरून मंत्री जितेंद्र आव्हाडही पोलिसात गेले आहेत.
छत्तीसगडमधील धर्मसंसदेत कालीचरण बाबानं महात्मा गांधींबाबत संतापजनक वक्तव्य करून नवा वाद निर्माण केलाय. महात्मा गांधींबाबत अपशब्दांचा वापर करतानाच कालीचरणनं नथुराम गोडसेंना नमन केलंय. त्यावरून जितेंद्र आव्हाड संतप्त झाले आहेत. बाबाविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच कालीचरण बाबानं आणखी एक व्हिडीओ शेअर करत फासावर द्या मात्र माफी मागणार नाही असं म्हणत वादाला आणखी फोडणी दिली. कालीचरण बाबाच्या संतापजनक वक्तव्याचे पडसाद राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही उमटेल. मविआ नेत्यांनी कालीचरण बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावरून मंत्री जितेंद्र आव्हाडही पोलिसात गेले आहेत.