अक्षय शिंदेचा एन्काऊंटर खरा की खोटा? जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ऑडिओ ट्विट; ऑडिओ क्लिपमध्ये काय?

| Updated on: Sep 29, 2024 | 10:13 AM

बदलापूर प्रकऱणातील अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर रोजी एन्काऊंटर करण्यात आला. पण हा एन्काऊंटर कुठे करण्यात आला? यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भाच एक ऑडिओ क्लिप ट्विट केली आहे. या कथित ऑडिओ क्लिपची टीव्ही 9 मराठी पृष्टी करत नाही

बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या अक्षय शिंदेच्या मृत्यूवरून शंका उपस्थित केली जात आहे. अशातच शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते, कळवा- मुंब्रा येथील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर संदर्भातील एक ऑडिओ ट्विट केला आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये दोन अज्ञात व्यक्ती अक्षय शिंदेच्या गोळीबारासंदर्भात संभाषण करताना ऐकायला मिळताय. यामध्ये पोलीस व्हॅनच्या मागे स्वतःची गाडी असल्याचा दावा या संभाषणातील एका व्यक्तीने दावा केला आहे. यासबोतच गोळीबाराचे तीन राऊंड ऐकल्याचे ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीचा दावा आहे. मात्र या कथित ऑडिओ क्लिपची टीव्ही 9 मराठी पृष्टी करत नाही. हा ऑडिओ ट्विट करताना जितेंद्र आव्हाड यांनी असेही म्हटले, ‘अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका… निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती.’

Published on: Sep 29, 2024 10:13 AM
आनंद दिघेंच्या मृत्यूवरून पुन्हा सवाल, संजय शिरसाटांचा मोठा दावा अन् रंगतोय नवा वाद
‘…म्हणूनच ABVP चा सुपडासाफ’, सिनेट निवडणुकीवरुन संजय राऊतांकडून सरकारला लक्ष्य