‘…त्यांचा मेंदू तपासण्याची गरज’, राष्ट्रवादीच्या नेत्यानं लगावला खोचक टोला
VIDEO | गुणरत्न सदावर्ते यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं उत्तर, बघा काय केला हल्लाबोल
ठाणे : गुणरत्न सदावर्ते यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी उत्तर दिले आह. ते म्हणाले, एका श्वासामध्ये भगवान गौतम बुद्धाचे नाव घ्यायचं आणि व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांच्या सोबत नथुराम गोडसे यांचा फोटो लावायचा त्यांचे उदातीकरण करायचं, या अर्थी भारतीय जनता पार्टीचे अजेंड्यावर नथुराम गोडसे पुनर्जीवन करून महाराष्ट्राला कोणत्या दिशेने सदावर्ते नेऊ इच्छितात हे त्यामधून स्पष्ट होत आहे. पवार साहेबांना टार्गेट केल्याशिवाय प्रसिध्दी मिळत नाही, हेडलाईन्स बनत नाही अशा पद्धतीने अनेक लोक शरद पवार यांना टार्गेट करीत असतात. त्यामध्ये गोपीचंद पडळकर आहेत, काल निलेश राणे होते, आता त्यात गुणरत्न सदावर्ते अशा लोकांची आम्हाला चिंता नाही. स्वतःच कर्तृत्व असतं त्याला दुसऱ्यांचे नाव घ्यावे लागत नाही, असे म्हणत महेश तपासे यांनी सदावर्ते यांच्यावर सडकून टीका केली. तर काही लोकांच्या मेंदूवर सुध्दा परिणाम होतो त्यामुळे ते द्वेषाने बोलत असतात. परंतु या देशामध्ये द्वेषाची नव्हे तर प्रेमाची भाषा समजते. प्रेमाने लोकांना आपलसं करून घ्यावे लागते. दुसऱ्यांना शिव्याशाप देवून कधीच आपण मोठ होवू शकत नाही. दुर्दैवाने ते काहींना कळत नाही अशा लोकांना कधी कधी स्वतःचा मेंदू तपासण्याची गरज आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.