Urfi Javed : ‘… तेव्हा चित्रा वाघ यांची दातखिळी बसते का?’ राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांचा सवाल
उर्फी जावेदवर बोलणाऱ्या चित्रा वाघ इतर प्रकरणात गप्प का? राहुल शेवाळे आणि श्रीकांत देशमुख प्रकरणात दातखिळी बसते का? राष्ट्रवादीच्या नेत्याचा चित्रा वाघ यांना सवाल
उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, शु्क्रवारी राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची उर्फीने भेट घेतली तर दुसरीकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील पत्रकार परिषद घेत उर्फी जावेदच्या कपड्यांवर भाष्य करत पुन्हा उर्फीवर निशाणा साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
अशातच आता उर्फी जावेदवर बोलणाऱ्या चित्रा वाघ इतर प्रकरणात गप्प का? राहुल शेवाळे आणि श्रीकांत देशमुख प्रकरणात दातखिळी बसते का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना विचारला आहे.
महिलांची खूप काळजी आहे, असा आव आणणाऱ्या चित्रा वाघ यांना राहुल शेवाळे आणि श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात बोलणाऱ्या महिला दिसत नाही का, त्यांच्याकडे चित्रा वाघ का जात नाही, का त्यांना त्यांच्याकडून सुपारी मिळाली आहे, असा सवाल ही राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना उपस्थित केला आहे.