Nawab Malik | फर्जी बाबाने Mahatma Gandhi यांचा अपमान केला – नवाब मलिक
नवाब मलिक यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. सत्य, अहिंसेला असत्य आणि हिंसक कधीही पराभूत करू शकत नाहीत. बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, असं खोचक ट्विट मलिक यांनी केलं आहे.
रायपूर येथील धर्मसंसदेत महात्मा गांधींवर आक्षेपाहार्य टीका केल्यामुळे कालीचरण महाराज अडचणीत आले आहेत. कालीचरण महाराजांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होताच त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही कालीचरण महाराजांवर टीका केली आहे. बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, असं ट्विट करत नवाब मलिक यांनी कालीचरण महाराजांवर निशाणा साधला आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. सत्य, अहिंसेला असत्य आणि हिंसक कधीही पराभूत करू शकत नाहीत. बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, असं खोचक ट्विट मलिक यांनी केलं आहे.
Published on: Dec 27, 2021 04:42 PM