Special Report | क्रूझ पार्टीत कॉंग्रेसच्या मंत्र्यांना अडकवण्याचा डाव होता ?
मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टीला पालक मंत्री अस्लम शेख यांनाही बोलावण्यात आलं होतं. काशिफ खान यांनी अस्लम शेख यांना पार्टीला येण्यासाठी फोर्स केला होता. तसेच काही राजकारण्यांच्या मुलांनाही पार्टीला येण्यासाठी ट्रॅप केलं जात होतं.
मुंबई: मुंबईतील क्रुझवरील पार्टीला पालकमंत्री अस्लम शेख आणि राजकारण्यांची मुलं गेली असती तर उडता पंजाब नंतर उलटा महाराष्ट्र करण्याचा गेम होता, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आत नवे गौप्यस्फोट केले. मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टीला पालक मंत्री अस्लम शेख यांनाही बोलावण्यात आलं होतं. काशिफ खान यांनी अस्लम शेख यांना पार्टीला येण्यासाठी फोर्स केला होता. तसेच काही राजकारण्यांच्या मुलांनाही पार्टीला येण्यासाठी ट्रॅप केलं जात होतं. मात्र, हे लोक गेले नाहीत. अस्लम शेख आणि राजकारण्यांची मुलं या पार्टीला गेले असते तर उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र करण्याचा गेम होता हे सत्य आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला.