कोणत्या अटींवर नवाब मलिक यांना मिळाला न्यायालयाकडून जामीन? कशी असणार जामीन प्रक्रिया?
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना तब्बल दीड वर्षांनी न्यायालययाकडून जामीन मिळाल्यानंतर ते तुरूंगाबाहेर येणार, कशी असणार नवाब मलिक यांची जामीन प्रक्रिया, बघा काय म्हणताय मलिक यांचे वकील निलेश भोसले?
मुंबई, १४ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने अटक केली होती. दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार करणे तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भातील हे प्रकरण होते. या कारणावरुन नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. याप्रकरणात प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना तब्बल एका वर्षानंतर त्यांना दोन महिन्यांसाठी सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयने अटक केली होती. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अन् गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार तसेच त्यांच्या बहिणीशी जमीन व्यवहार प्रकरणामुळे मलिक अडचणीत आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालायने प्रकृतीच्या कारणामुळे दोन महिन्यांसाठी त्यांचा जामीन मंजूर केला आहे. सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर आज सत्र न्यायालयातील प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाने देखील नवाब मलिक यांना अटी शर्तींच्या आधारे जामीन मंजूर केला आहे. कोणत्या आहेत त्या अटी आणि कशी असणार जामीन प्रक्रिया स्वतः नवाब मलिक यांचे वकील निलेश भोसले सांगताय…