Nawab Malik Live | किरीट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे- नवाब मलिक
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांनी इतरांच्या पोरांकडे बोट दाखवताना आधी आपला मुलगा काय करतो हे पाहावं, असा घणाघाती हल्ला नवाब मलिक यांनी चढवला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांनी इतरांच्या पोरांकडे बोट दाखवताना आधी आपला मुलगा काय करतो हे पाहावं, असा घणाघाती हल्ला नवाब मलिक यांनी चढवला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली. मुश्रीफ यांच्यावर इन्कम टॅक्सने छापेमारी केली होती. त्यात त्यांना काही मिळाले नाही. दोन वर्ष झाली तरी या प्रकरणी कारवाई झाली नाही. आज सोमय्या ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, ते बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने करत आहेत. सोमय्या यांना कोणीही सीरियस घेत नाही. स्वत:चा बडेजाव निर्माण करून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचं काम ते करत आहे. इतरांच्या पोरांवर बोट दाखवत असताना स्वत:ची मुलं काय करतात याकडे लक्ष द्या. मुलगा कुणाला फोन करतो, कुणाला खंडणी मागतो, तुमचे नातेवाईक काय करतात, त्यांच्या किती बोगस कंपन्या आहेत, ते कसं मनी लॉन्ड्रिंग करतात हे पण लोकांना माहीत आहे, असं मलिक म्हणाले.