Nawab Malik Tweet | पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, आर्यनच्या जामिनानंतर नवाब मलिकांचं ट्विट
आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जोरदार टोला लगावलाय. तुरुंगात टाकणारा आज तुरुंगात जायला घाबरतोय, अशी टीका मलिक यांनी वानखेडेंवर केलीय. प्रत्येक वेळी आपल्या वकिलांद्वारे एनसीबी आपली भूमिका बदलते. त्यांचा प्रयत्न असतो की लोकांना जास्त काल जेलमध्ये कसं ठेवण्यात येईल. लोकांच्या मनात भीती कशी निर्माण करता येईल. ज्यांनी हे फर्जी प्रकरण बनवलं त्यांच्याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ, जे पुरावे आहेत ते सादर करु, असं मलिक म्हणाले.
आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जोरदार टोला लगावलाय. तुरुंगात टाकणारा आज तुरुंगात जायला घाबरतोय, अशी टीका मलिक यांनी वानखेडेंवर केलीय.
मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज आर्यन खानसह तीन आरोपींना जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी कालच दोन आरोपींना एनडीपीएस विशेष न्यायालयाने जामीन दिला होता. ज्या प्रकारे फर्जी प्रकरण बनवण्यात आलं, सुरुवातीलाच न्यायालयात त्यांना जामीन मिळाला असता. मात्र प्रत्येक वेळी आपल्या वकिलांद्वारे एनसीबी आपली भूमिका बदलते. त्यांचा प्रयत्न असतो की लोकांना जास्त काल जेलमध्ये कसं ठेवण्यात येईल. लोकांच्या मनात भीती कशी निर्माण करता येईल. ज्यांनी हे फर्जी प्रकरण बनवलं त्यांच्याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ, जे पुरावे आहेत ते सादर करु, असं मलिक म्हणाले.
त्याचबरोबर योगायोग म्हणावा लागेल की, ज्या अधिकाऱ्यांना यांना जेलमध्ये टाकलं. तोच अधिकारी आज जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी हायकोर्टात गेला. महाराष्ट्र पोलीस या प्रकरणी जो तपास करत आहे तो तपास सीबीआय कडून करण्यात यावा अशी मागणी त्याने केलीय. मुंबई पोलिसांनी सांगितलं की त्यांना अटक करण्यापूर्वी 72 तासांची नोटीस दिली जाईल. तुरुंगात टाकणारा आज तुरुंगात जाण्याला घाबरतोय. मला वाटतं की जो फर्जीवाडा त्यांनी केलाय तो आता समोर येत आहे, अशी टीकाही मलिक यांनी केलीय. इतकंच नाही तर मलिक यांनी एक ट्विट करुन ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.