Nawab Malik | आर्यन खान प्रकरण हे खंडणी आणि अपहरणाचं प्रकरण होतं -नवाब मलिक
नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याच्या फर्जीवाड्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी सुरुवातीपासूनच आर्यन खानचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आले होते हे सांगत होतो. आता हे या आदेशावरून स्पष्ट झाले आहे, असे मलिक यांनी सांगितलं.
मुंबई: आर्यन खानचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही. म्हणजे हा फर्जीवाडा होता, हे आता हायकोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे, असं सांगतानाच हा फर्जीवाडा करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना निलंबित करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. आज हायकोर्टाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याच्या फर्जीवाड्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी सुरुवातीपासूनच आर्यन खानचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आले होते हे सांगत होतो. आता हे या आदेशावरून स्पष्ट झाले आहे, असे मलिक यांनी सांगितलं.