फक्त स्टेजवरून भाषणं करायची नसतात तर…, रोहित पवार यांचा रोख नेमका कुणावर?
VIDEO | चौंडी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार - रोहित पवार
अहमदनगर : काम न करता मोदींच्या लाटेत निवडून येऊ, असं अनेकांना वाटतंय. पण लाट एकदा, दोनदा येते पण तिसऱ्यांदा ती येईलच असं नाही, असं म्हणत रोहित पवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे अहमदनगर येथे टीव्ही 9 मराठीशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. दिल्लीत दोन महापुरुषांचे पुतळे हटवून तुम्ही सावरकरांची जयंती साजरी केली गेली तरी जे बोलघेवडे आणि चॉकलेट बॉय आहेत ते गप्प, असे म्हणत रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. तर नुसतं भाषण करून, टाळ्या वाजवून लोकांचे प्रश्न सुटत नसतात. त्यासाठी कामं करावी लागतात, असेही रोहित पवार यांनी म्हटले. दरम्यान, यावेळी त्यांनी असेही म्हटले की, चौंडी येथील अहिल्याबाई स्मारकाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एखनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहे. त्याचे आम्ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून स्वागत करू, गावात त्यांच्या स्वागताचे बॅनर लावले असून त्यांचे स्वागत असल्याचा आशय त्यावर आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी असे म्हटले.