राज्यपाल कोश्यारी यांचा ‘विषारी’ असा उल्लेख, काय म्हणाल्या रूपाली ठोंबरे पाटील?

| Updated on: Feb 12, 2023 | 4:22 PM

VIDEO | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांची प्रतिक्रिया, बघा व्हिडीओ

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी भाष्य केले आहे. आज राज्यपाल विषारी कोश्यारी यांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवल्याबद्दल मी राष्ट्रपतींचे मनःपूर्वक आभार मानते. सातत्याने बेताल वक्तव्य करून वातावरण गढूळ कऱण्याचे काम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. भाजपच्या धोरणाची अमलंबजावणी करणारे आणि त्यांनी त्यांच्या पदाला काळं फासलं होतं आणि हे राज्याच्या भवितव्यासाठी आणि हितासाठी योग्य नव्हते. त्यामुळे राज्यपाल कोश्यारींनी त्यांचा राजीनामा फार पूर्वीच द्यायला हवा होता. मात्र उशिरा का होईल, त्यांनी हा राजीनामा दिला आणि राष्ट्रपतींनी या विषारी राज्यपालांची महाराष्ट्राबाहेर हकालपट्टी केली त्याबद्दल रूपाली ठोंबरे पाटील यांनी पुन्हा आभार व्यक्त केले आहे.

Published on: Feb 12, 2023 04:17 PM
कोश्यारी यांच्यासारखे राज्यपाल महाराष्ट्राला पुन्हा…, काय म्हणाले राज्यपालांच्या राजीनाम्यावर संजय पवार?
राज्यपालांची प्रतिमा महाराष्ट्रात वादाची ठरली, काय म्हणाले एकनाथ खडसे?