तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता, शरद पवारांचा मोठा खुलासा

| Updated on: May 19, 2024 | 2:09 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तपत्रात मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत अनेक धक्कादायक बाबी त्यांनी उघड केल्या आहेत. २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. त्यांच्या नावाबद्दल शिवसेनेत चर्चा झाल्याची माहिती आम्हाला नंतर कळल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तपत्रात मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी मोठा दावा करत गौप्यस्फोटही केलाय. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. तर प्रफुल्ल पटेल २००४ पासून भाजपकडे जाण्याचा आग्रह करत होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. त्यांच्या नावाबद्दल शिवसेनेत चर्चा झाल्याची माहिती आम्हाला नंतर कळल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. यासह पवार असेही म्हणाले की, मी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधी भेद केला नाही. पक्षात काम करणाऱ्यांना संधी मिळाली नाही, ही अजित पवार यांची ओरळ निरर्थक असल्याचेही त्यांनी म्हटले.