शरद पवार यांचा व्हायरल OBC दाखला खरा की खोटा? राष्ट्रवादीचं बोट भाजपकडे? बघा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Nov 13, 2023 | 11:21 AM

जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना आता शरद पवार यांनी आता कुणबी प्रमाणपत्र काढल्याचा दावा करत ते ओबीसी असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय. व्हायरल होणारा दाखला पाहिला तर नाव, जन्म ठिकाणी, जन्मतारीख, पक्षाचं नाव, व्यवसाय, धर्म आणि त्याखाली जातीचा उल्लेख काय?

Follow us on

मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३ | शरद पवार यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर केला जातोय. हा व्हायरल होणारा दावा खरा आहे की खोटा? असा सवाल सध्या केला जातोय. जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना आता शरद पवार यांनी आता कुणबी प्रमाणपत्र काढल्याचा दावा करत ते ओबीसी असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय. व्हायरल होणारा दाखला पाहिला तर नाव, जन्म ठिकाणी, जन्मतारीख, पक्षाचं नाव, व्यवसाय, धर्म आणि त्याखाली जातीचा उल्लेख करण्यात आलाय. मात्र हा व्हायरल होणाऱ्या दाखल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी खोटा ठरवलाय. तर इतरांनी शरद पवार यांचा शाळा सोडल्याचा दाखला दाखवत दोन जातीत वाद निर्माण करण्यामध्ये भाजपचा हात असल्याचा आरोप केलाय. बघा नेमकं काय आहे प्रकरण?