Sharad Pawar | देशाने एक महानायक गमावला, शरद पवारांकडून दिलीप कुमारांना श्रद्धांजली
अभिनयाचं विद्यापीठ, ट्रॅजेडी किंग म्हणून ओळख असणारे आणि अनेक पिढ्यांवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी दिलीप कुमारांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिलीप कुमारांच्या आठवणीत भावुक झाले.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी दिलीप कुमारांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारबी दिलीप कुमारांच्या आठवणीत भावुक झाले. जेजुरीत दिलीप कुमार यांचं शुटिंग सुरू होतं. आम्हाला त्याची कुणकुण लागली. मग आम्ही मित्रांनी सायकली काढल्या आणि सायकलवरून प्रवास करत जेजुरी गाठली. त्यावेळी मला पहिल्यांदा लांबून का होईना दिलीप कुमार यांना पाहता आलं, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगत होते. नंतर मी राजकारणात आलो. सरकारमध्ये विविध पदावर असताना दिलीप कुमार यांच्याशी माझा दोस्ताना झाला. ते लोकप्रिय आणि महान अभिनेते होतेच. पण माणूस म्हणूनही तितकेच ग्रेट होते, अशा शब्दात शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्याबाबतच्या आठवणी जागवल्या.
अभिनय सम्राट दिलीप कुमार यांचं निधन झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. आपल्या मित्राच्या निधनाने शरद पवारही व्यथित झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देतानाच दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला.