राष्ट्रवादी करणार ‘भाजप युवा मोर्चा’चं आयुष्यभर लक्षात राहील असं स्वागत, कुणी दिला इशारा?
भाजपच्या युवा मोर्च्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टाईलने स्वागत करू आणि ते स्वागत नक्कीच आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहणार, सुरज चव्हाण यांचा खोचक इशारा
मुंबई : भाजपच्या युवा मोर्च्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चेकऱ्यांचं स्वागत आहे. भाजपच्या युवा मोर्च्याचं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टाईलने स्वागत करू आणि ते स्वागत नक्कीच आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहील, असा खोचक इशारा राष्ट्रवादी नेते सुरज चव्हाण यांनी दिला आहे. हे स्वागत करण्यामागील कारण सांगताना ते म्हणाले, ज्यावेळी भाजपच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. त्यावेळी भाजप युवा मोर्चा मूक गिळून गप्प होता आणि आता जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याची मोडतोड करून सादर केल्याप्रकऱणी भाजपकडून मोर्चा काढला जात आहे, आम्ही भाजपच्या युवा मोर्चाचे नक्की स्वागत करू, असे सुरज चव्हाण यांनी म्हटले आहे.
Published on: Feb 06, 2023 10:51 AM