‘चित्रा वाघ यांचे कारनामे माझ्या पेनड्राईव्हमध्ये, सगळं उघड…’, शरद पवार गटातील महिला नेत्याचा थेट इशारा
'तुझ्यासारख्या खोटारड्या, बनेल आणि ब्लॅकमेलिंग करणारी महिला पक्षात मोठं पद मिळवण्यासाठी काहीही करू शकते. हे आमच्याशिवाय जवळून कोणी पाहिलंय... माझ्याकडे असणाऱ्या पेनड्राईव्हमध्ये चित्रा वाघ काय-काय बोलते... तिची सगळे कारनामे आहेत.', शरद पवार गटातील महिला नेत्याचा थेट इशारा
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याबद्दल शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी मोठा दावा केल्याचे समोर आले आहे. चित्रा वाघ यांचे कारनामे माझ्याकडच्या पेनड्राईव्हमध्ये आहेत, असं वक्तव्य विद्या चव्हाण यांनी केले आहे. इतकंच नाहीतर आज दुपारी तीन वाजता सगळं उघड करणार असा इशाराच विद्या चव्हाण यांनी दिला आहे. ‘तुझ्यासारख्या खोटारड्या, बनेल आणि ब्लॅकमेलिंग करणारी महिला पक्षात मोठं पद मिळवण्यासाठी काहीही करू शकते. हे आमच्याशिवाय जवळून कोणी पाहिलंय… माझ्याकडे असणाऱ्या पेनड्राईव्हमध्ये चित्रा वाघ काय-काय बोलते… तिची सगळे कारनामे आहेत.’, असं विद्या चव्हाण यांनी म्हणत चित्रा वाघ यांना एकप्रकारे थेट इशाराच दिल्याचे पाहायला मिळतंय. त्यामुळे आज दुपारी तीन वाजता नेमकं काय बोलणार विद्या चव्हाण याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 30, 2024 12:42 PM