राष्ट्रवादी आक्रमक, शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला अन् आयुक्तालयासमोर आंदोलन; काय आहे कारण?
VIDEO | राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला; मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन
मुंबई : क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाणाचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत नेते छगन भुजबळ यांच्यासह अजित पवार आणि जयंत पाटील यांनी एकत्र रस्त्यावर उतरत राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी घालून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी छगन भुजबळ यांच्यासह अजित पवार आणि जयंत पाटील यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. ‘इंडिक टेल्स’ नामक मनुवादी वृत्तीच्या वेबसाइटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीचं लिखाण करण्यात आलेलं आहे. या लेखातील भाषा अतिशय अपमानजनक आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे, असे छगन भुजबळ यांनी एका पत्रात म्हटले आहे. हे पत्र भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.