विजय वडेट्टीवारांना नाना पटोलेंचं वर्चस्व सहन होत नाही, कुणी केला मोठा गौप्यस्फोट?
'आता नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीच्या निकालात काँग्रेसच्या जास्त जागा आल्यात त्यामुळे नाना पटोले यांचं वर्चस्व त्यांना सहन होत नाही म्हणून विजय वडेट्टीवार हे लवकरात लवकर भाजप पक्षामध्ये अधिकृतरित्या प्रवेश करताना दिसतील', कुणी केला खळबळजनक दावा?
विजय वडेट्टीवार लवकरच भाजप पक्षामध्ये प्रवेश करतील. विजय वडेट्टीवार हे काँग्रेस पक्षात नाराज आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. अमोल मिटकरी यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाहीतर अमोल मिटकरी पुढे असेही म्हणाले की, आता नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीच्या निकालात काँग्रेसच्या जास्त जागा आल्यात त्यामुळे नाना पटोले यांचं वर्चस्व त्यांना सहन होत नाही म्हणून विजय वडेट्टीवार हे लवकरात लवकर भाजप पक्षामध्ये अधिकृतरित्या प्रवेश करताना दिसतील, असा मोठा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. तर अजित पवार यांच्यावर कमळावर निवडणूक लढण्यासाठी भाजपकडून दबाव होता, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा दावा केला होता. यावर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘रोहित पवार माझ्या लायकीचे नेते नाहीत. ते गल्ली बोळातले नेते आहेत’ , असं म्हणत त्यांनी रोहित पवारांवर जिव्हारी लागणारी टीका केली.