‘…तर जितेंद्र आव्हाडांनी दादांच्या बारामतीतील म्हशीच्या गोठ्यावर काम करावं’, कोणी दिलं खुलं आव्हान?

| Updated on: Nov 22, 2024 | 4:42 PM

लोकसभेत नणंद-भावजय यांच्या चुरशीची लढत झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात काका-पुतण्या आमने-सामने ठाकले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार तर त्यांच्या विरोधात स्वतः अजित पवार हे निवडणूक लढवत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. दरम्यान, विधानसभेतील प्रमुख लढतींपैकी बारामती मतदारसंघातकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारणं बारामतीत लोकसभेनंतर पुन्हा विधानसभेला पवार विरुद्ध पवार असा सामना रंगतोय. लोकसभेत नणंद-भावजय यांच्या चुरशीची लढत झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात काका-पुतण्या आमने-सामने ठाकले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार तर त्यांच्या विरोधात स्वतः अजित पवार हे निवडणूक लढवत आहेत. अशातच शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार हे विधानसभा निवडणुकीत विजयी होतील असा दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यावर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘जितेंद्र आव्हाड आता दिवसाही असं वक्तव्य करत असल्याने त्यांच्या २४ तासावरच शंका निर्माण होऊ लागली आहे. महाराष्ट्राच्या तुल्यबळ लढतीत आम्ही बारामती पाहत नाही. बारामतीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी होता. मतदारांनी ठरवलं होतं. लोकसभेत सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार… त्यामुळे विकासाला मतदारांनी मत दिलं आहे. एक लाखांच्या मतांच्या फरकाने अजित पवार जिंकले किंवा दादा विजयी झाले तर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या घरी घरगडी म्हणून राहावे आणि अजित पवार पराभूत झाले तर मी आव्हाडांच्या घरी घरगडी म्हणून कामाला जाईल’, असं खुलं चॅलेंज अमोल मिटकरींनी दिलंय.

Published on: Nov 22, 2024 04:42 PM
Bacchu Kadu : बच्चू कडूंना महायुती अन् मविआकडून फोन सुरू, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला? स्पष्टच म्हणाले…
Sharad Pawar : निकालाला काहीच तास शिल्लक अन् शरद पवारांकडून मोठा दावा; म्हणाले, ‘काळजी करू नका, राज्यात…’