सोन्याचा चमचा तोंडात… रोहित पवारांनी काढली लायकी, अमोल मिटकरींचा पलटवार काय?
'माझं पवार घराण्याच्या वादात पडण्याचं काही काम नाही पण मी अजित पवार यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. माझी लायकी आत्ता बालमित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार हे काढत आहे. मी शेतकऱ्यांच्या पोरगा आहे, ही माझी लायकी', रोहित पवारांवर मिटकरींचा पलटवार
मुंबई, २० मार्च २०२४ : ज्या व्यक्तीने श्रीनिवास काकांच्या विरोधात वक्तव्य केलं , त्या व्यक्तीची काय लायकी हे लोकांना माहिती आहे, असं वक्तव्य करत अजित पवार गटातील अमोल मिटकरी यांची रोहित पवार यांनी लायकीच काढली होती. यावर अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे. ‘माझं पवार घराण्याच्या वादात पडण्याचं काही काम नाही पण मी अजित पवार यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. माझी लायकी आत्ता बालमित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार हे काढत आहे. मी शेतकऱ्यांच्या पोरगा आहे, ही माझी लायकी आहे, तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आहात… त्यामुळे तुम्ही आत्ता पक्षात अजित पवार बनण्याचा प्रयत्न करत आहात ते कधीही होणार नाही. तुमची पक्षात काय लायकी आहे ते बघा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून पुढील तीन दिवसात पक्षाची जबाबदारी दिली आहे अस एक पत्र घेऊन यावं’, असं आव्हान मिटकरींनी रोहित पवार यांना दिलं.