अजित पवार सत्तेत आल्यानंतर नरहरी झिरवळ पुन्हा सक्रीय, 24 आमदारांसह राज्यपालांच्या भेटीला
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आज राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला, कारण काय?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे आज राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला गेले होते. यावेळी नरहरी झिरवळ यांच्यासह २४ आमदार देखील होते. गेल्या काही दिवसांपूर्वी सत्तेत अजित पवार सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर नरहरी झिरवळ पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. राज्यातील आदिवासी भागातील १५ आमदारांनी आज आदिवासी भागातील विविध समस्यांबाबत राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार राजेंद्र गावीत आदी उपस्थित होते. नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना नोटीस बजावली होती. झिरवाळ यांच्या नोटीसवरुन सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद रंगला. सर्वोच्च न्यायालयाने आता हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलं आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे नरहरी झिरवळ हे गेल्या वर्षी राजकारणात चर्चेत आले होते.