राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा आज फैसला, कोणाचे आमदार होणार अपात्र?
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत. दुपारी साडे चार वाजता या निकाल वाचणास सुरूवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका काय निकाल देणार...?
मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा आज निकाल समोर येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत. दुपारी साडे चार वाजता या निकाल वाचणास सुरूवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका काय निकाल देणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिले आहेत. विधिमंडळ पक्ष कोण याचा फैसला आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत. विधिमंडळ पक्ष ठरल्यानतंरच पात्र आणि अपात्र कोण हे ठरवण्यात येईल. दरम्यान, सत्तेत गेलेले अजितदादा गटाचे ९ मंत्री अपात्र करा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. याउलट अजित पवार गटाकडून शरद पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची मागणी केली जात आहे. सध्या अजित पवार यांच्याकडे सध्या ४१ तर शरद पवार यांच्याकडे १४ आमदारांचं समर्थन आहे. त्यामुळे नेमके कोणाचे आमदार अपात्र होणार याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत.