‘आपापल्या बायका अन् तुमच्या कोण असतील त्यांना पण घेऊन या…’, अजितदादांच्या आमदाराची अजब तंबी
इंदापुर येथील राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी तुम्ही तर याच पण तुमच्या बायका पण घेऊन या..चेष्टेचा विषय नाही. मी माझी सुध्दा बायको आणणार आहे, ती कधी येत नव्हती. तरी पण मी तिला आणणार आहे. सगळ्यांनी आपापल्या बायका अन् कोण असतील त्यांना पण घेऊन या.. असं म्हटलंय.
जन सन्मान यात्रेला आपापल्या बायका घेऊन या…असं वक्तव्य करत इंदापुर येथील राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पदाधिकाऱ्यांना भर सभेत तंबी दिल्याने त्यांच्या वक्तव्याची एकच चर्चा होताना दिसते. ‘मी माझी बायको आणणार आहे. ती कधी बाहेर येत नाही पण मी तिला आणणार आहे.’, असं अजब वक्तव्य आमदार दत्तात्रय भरणे यांनी केल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जन सन्मान यात्रा येत्या शुक्रवारी इंदापुरात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना वाट्टेल ते करा.. व्हाटस्अपला सगळ्यांनी मेसेज पाठवा… महिला भगिनींच इतकं सगळं चांगलं झालंय की, त्यामुळं महिला भगिनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने हजर पाहिजेत, अशी तंबी दत्तात्रय भरणे यांनी पादाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिली आहे. आमदार भरणेंनी असं वक्तव्य केल्याने त्यांच्या वक्तव्याबाबत आश्चर्य केले जात आहे.