…तर गोपीचंद पडळकर यांना नीट करायला वेळ लागणार नाही, कुणी दिला थेट इशारा

| Updated on: Jun 07, 2023 | 11:51 AM

VIDEO | शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना संस्कार शिबिरात प्रवेश द्या, कुणी केली खोचक टीका

अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली होती. यावरून गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी इशारा दिलाय. आपली उंची काय आपण बोलतोय काय? असा सवाल करत चांगलेच खडबोल सुनावले आहेत. शरद पवार म्हणजे या राज्याला मिळलेला परिस आहे, त्यांच्यामुळे राज्यात अनेक विकास कामं झाली. महाराष्ट्राच्या प्रत्येक घडामोडीत शरद पवार आहेत, त्यांच्याबद्दल एखाद्या कवडीमोल किंमत असलेल्या व्यक्तीने बोलावे म्हणजे त्याची आणि सुसंस्कृतपणाची कधी भेटच झाली नाही, अशी टीका आमदार लंके यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केलीये. सोबतच सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने अनेक ठिकाणी संस्कार शिबीरं सुरू आहेत तिथे अशा लोकांना पाठवण्याची गरज आहे. राष्ट्रवादी पक्ष हा सुसंस्कृत पक्ष आहे , शरद पवारांनी एक शिकवण आम्हाला दिली आहे अन्यथा अशा पडळकरांना व्यवस्थित करायला वेळ लागणार नाही असा इशाराच आमदार लंके यांनी दिला.

Published on: Jun 07, 2023 11:51 AM
कोल्हापुरात आक्षेपार्ह स्टेटसचे पडसाद; छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू संघटना आक्रमक
समनापूरच्या वादावर प्रसिद्ध वडापाव विक्रेते अन्सार चाचा म्हणाले, ‘माझी प्रेमाने विनंती आहे, मायबाप…’