Nilesh Lanke | सत्तेचा माज आलाय काय? आमदार निलेश लंके चंद्रकांतदादांवर भडकले
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्याने राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्याने राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत. राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा निषेध करत बोलताना जरा भान बाळगण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ आणि आदरणीय नेते आहेत. देशावर आणि राज्यावर आलेल्या प्रत्येक संकटसमयी शरद पवार धावून गेले आहेत. मग गुजरातमधील भूकंप असो, किल्लारीचा भूकंप असो, कोल्हपूर सांगलीला आलेला महापूर असो… प्रत्येकवेळी शरद पवार मदतीसाठी पुढे गेले.
देशाच्या राजकारणात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं, देशाचं राजकारण नेहमी त्यांच्याभोवती फिरत राहतं. मग अशा नेत्याविषयी बोलताना जरासं भान बाळगावं, असा सल्ला निलेश लंके यांंनी चंद्रकांतदादांनी दिला. तसंच चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत यापुढे सांभाळून बोलण्याचा सल्ला दिलाय.