महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूंकप होणार? या आमदारानं केला मोठा दावा अन् उडाली खळबळ

| Updated on: Apr 22, 2023 | 1:29 PM

VIDEO | 'महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार', 'या' आमदाराच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ

बीड : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या चर्चांना पूर्णविराम दिला. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके  यांनी महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचं विधान केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पुढच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला काही ना काही चमत्कार करावा लागणार आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं असं आमदार सोळुंके यांनी म्हंटलं आहे. महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार असून सध्या महाराष्ट्रात जी चर्चा सुरू आहे. ते नक्की होणारच त्याबद्दल कोणीही शंका आणू नये. असे विधान बीडच्या माजलगावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केलंय. माजलगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीरपणे ही भूमिका मांडलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

Published on: Apr 22, 2023 01:29 PM
माजी मुख्यमंत्र्यांनी अक्षय्य तृतीयेसह रमजान ईदच्या जनतेला दिल्या शुभेच्छा, म्हणाले…
अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा; संजय राऊत म्हणताय, ‘त्यांच्यात क्षमता पण लायकी नसलेले…’