रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले…
खोट्या तक्रारी करून आणि दबाव तंत्राचा वापर करून इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक करण्यात आलेले आहे. अप्रत्यक्षपणे तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय तरी आम्ही या शक्तीला घाबरत नसल्याचे रोहित पवार म्हणाले. तर भाजपचे ट्रोल आर्मीचे काही लोक आहेत.
वाशिम, २९ नोव्हेंबर, २०२३ : युवा संघर्ष यात्रा ही युवांचे प्रश्न घेऊन चाललेली यात्रा आहे. त्याला खूप चांगला प्रतिसाद सामान्य लोकांकडून मिळतोय. हा प्रतिसाद बघितल्यानंतर आमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक करण्यात आलेले आहे. खोट्या तक्रारी करून आणि दबाव तंत्राचा वापर करून अशा पद्धतीने प्रयत्न होत आहे. याचा अर्थ म्हणजे अप्रत्यक्षपणे तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय तरी आम्ही या शक्तीला घाबरत नसल्याचे रोहित पवार म्हणाले. तर भाजपचे ट्रोल आर्मीचे काही लोक आहेत. ज्यांना कमेंट साठी तीन रुपये तर लाईकसाठी तीस पैसे मिळतात त्यांच्याकडून भाजप विरोधी बोलणाऱ्या पेजला टार्गेट करून त्यांची तक्रार करून अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोपही रोहित पवार यांनी केलाय. पण आमचा विश्वास लोकांवर आहे आम्ही अजून जास्त लोकात जाणार आणि लोकांचे मुद्दे समजून घेऊन अधिवेशनात ते मांडणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलंय.