Ajit Pawar भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य काय?

| Updated on: Sep 22, 2023 | 3:07 PM

VIDEO | आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंतच भाजप अजित पवार यांचं अस्तित्व ठेवणार? आगामी निवडणुकीमध्ये अजित पवार यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार? राष्ट्रवादीच्या नेत्यानं नेमकं काय केलं वक्तव्य?

मुंबई, २२ सप्टेंबर २०२३ | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंतच भाजप अजित पवार यांचं अस्तित्व ठेवणार आहे. तर आगामी निवडणुकीमध्ये अजित पवार यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. रोहित पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. भाजपच्या नेत्यांनी काही आदेश दिला असावा, तुम्ही काही आमदारांना अपत्र करा, असे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. असे म्हणत निवडणूक आयोग भाजपच्या हातातील एक बाहुली आहे, त्यामुळे आयोग कोणताच्या बाजून निर्णय देणार हे आपल्याला माहित असल्याचे म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

Published on: Sep 22, 2023 03:02 PM