‘कर्नाटकात पाळणा हलवायला गेलात, पण तुमचा पाळणा…’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मुख्यमंत्री शिंदे यांना खोचक टोला
VIDEO | कर्नाटकातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार दौऱ्यावर राष्ट्रवादी नेत्याची सडकून टीका, काय म्हणाले बघा...
पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून राज्यासह देशभरात जोरदार रणधुमाळी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दारूण पराभव केला. काँग्रेसला मिळालेल्या विजयावरून आता महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. कर्नाटकात मराठी भाषिक उमेदवार, भाजपचा उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कर्नाटकात प्रचाराला गेले होते. मात्र तरीही अपयश आल्याने विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. त्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी कर्नाटकाच्या निकालावरून एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे की, बदल हा लोकं करत असतात. त्यामुळे सत्ता संघर्ष सुरू होता आणि त्याला नऊ महिने होऊन गेले आहेत. त्यामुळे आता तुम्ही शब्दांचे खेळ करू नका,तसेच मुलगा कुठे बारसं कुठे. त्यामुळे तुम्हीदेखील पाळणा हलवायला गेलेला होतात पण तुमचा पाळणा हलला नाही, त्यामुळे लोकांना आता गंडवू नका असला टोलाही रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.