Rohit Pawar UnCut | पुरावे असल्याशिवाय नवाब मलिक बोलणार नाहीत – रोहित पवार
पदाचा गैरवापर किंवा व्यक्तिगत हितासाठी करायचा असेल, या हेतूने ब्लॅकमेल असेल तर ते चुकीचे आहे. अशी प्रथा पडू नये. या व्यक्तीला नावानिशी ओळखत नाही, कधी कुठे संबंध आला असेल तर माहीत नाही.
पुणे : आतापर्यंत मालिकांनी जे जे कागदपत्रे मिडियासमोर आणलेत त्यानुसार हे सगळे आरोप प्रुफ असल्याशिवाय केलेले नसावेत. पदाचा गैरवापर किंवा व्यक्तिगत हितासाठी करायचा असेल, या हेतूने ब्लॅकमेल असेल तर ते चुकीचे आहे. अशी प्रथा पडू नये. या व्यक्तीला नावानिशी ओळखत नाही, कधी कुठे संबंध आला असेल तर माहीत नाही. बीजेपी पक्षात खळबळ उडल्याचं जाणवत आहे. या गोष्टीचा शेवट व्हावा जे लोक यात इन्व्हॉल्व्ह आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी. मला राज्यातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना विचारायचं आहे, राज्याच्या हितासाठी केंद्राकडे कसा पाठपुरावा केला. केंद्रात कोणी ऐकत नाही असा विषय असू शकतो, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले.