मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या झालेल्या हल्ल्याबाबत रोहित पवार म्हणतात…
VIDEO | राजकीय लोकंच जर सुरक्षित नसतील तर सामन्य लोकांच्या सुरक्षेचं काय? राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार नेमकं काय म्हणाले...
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केला. शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना संदीप देशपांडे यांच्यावर काही हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावून लोखंडी रॉड आणि स्टम्पने हल्ला केला. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. गेल्या ९ महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देण्यात आली, आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला, कोल्हापूरातील आमदार यांच्यावर हल्ला आणि आज मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. राजकीय लोकंच जर सुरक्षित नसतील तर सामन्य लोकांच्या सुरक्षेचं काय? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. प्रशासन वेगळ्या कामात गुंतली असल्याने सामान्य लोकांना सेवा न देता हे हल्ले होत आहे. याची शहाःनिशा करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, जेणेकरून सर्वजण सुरक्षित राहतील. यासह हा विषय आजच्या अधिवेशनात सभागृहात नक्कीच मांडू, असा शब्दही रोहित पवार यांनी दिला आहे.