एकनाथ शिंदे फक्त मराठ्यांचे मुख्यमंत्री आहेत का? रोहित पवार यांचा खोचक सवाल

| Updated on: Feb 25, 2023 | 3:26 PM

VIDEO | गुलाबराव पाटील यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्यावर रोहित पवार यांची टीका, मुख्यमंत्र्याचे कर्तृत्व नाही का? म्हणत केला सवाल

नाशिक : एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला. त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, असं वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं, यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. सर्व गोष्टी हाताबाहेर जातात तेव्हा अशा प्रकारची वक्तव्य होतात. एकनाथ शिंदे फक्त मराठ्यांचे मुख्यमंत्री आहेत का? पण कर्तृत्व काहीच नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. राज्याचा विकास बाजूला ठेवून अशा पद्धतीने वक्तव्य करतात त्यावेळी ते अयोग्य आहे. त्यामुळे अशा लोकांना समावेशक राजकारण करण्याची जरूरत आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात जातीय आणि धार्मिक राजकारण करून सर्व समाजाचे प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन सकारात्मक धोरण तयार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

Published on: Feb 25, 2023 03:26 PM
काँग्रेस पुन्हा उभारी घेणार; ‘या’ निवडणुकीत त्याचा परिणाम दिलेल; काँग्रेस नेत्याला विश्वास
शिव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात भेट; भेटीत नेमकं काय बोलणं झालं? शिव म्हणाला…