रोहित पवार म्हणाले, दादा शांत बसत असलतील तर…, अजितदादांसमोरच शरद पवार यांच्यावर मोदींची टीका

| Updated on: Oct 27, 2023 | 6:35 PM

VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरूवारी शिर्डीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या समोरच भाषणातून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेवर सुप्रिया सुळे आणि काही नेत्यांनी प्रत्युत्तर दिले. आता रोहित पवार यांनी देखील यावर भाष्य केले

पुणे, २७ ऑक्टोबर २०२३ | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरूवारी शिर्डीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या समोरच भाषणातून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेवर सुप्रिया सुळे आणि काही नेत्यांनी प्रत्युत्तर दिले. आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील यावर भाष्य केले असून अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आले असताना एकाच मंचावर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे देखील उपस्थित होते. काल मोदींनी शरद पवार यांच्यावर टीका केली तेव्हा अजित दादा व्यासपीठावर होते. त्यांनी बोलायला पाहिजे होते. मराठी माणूस हा प्रतिउत्तर देणारा माणूस असतो, असे रोहित पवार यांनी म्हटले तर अजित दादांनी पूर्वीच्या भाषणात शरद पवार यांचे गुणगान गायलेले आहेत मात्र अशा वेळी अजित दादा शांत बसत असलतील तर आम्हाला हे अवघड वाटते योग्य वाटत नाही, असे स्पष्ट मत रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Published on: Oct 27, 2023 06:34 PM
Sushma Andhare : सुषमा अंधारे यांनी ललित पाटीलच्या मृत्यूची व्यक्त केली भिती, म्हणाल्या एन्काऊंटर होणार?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणताय…मी पुन्हा येईन, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार?