Baramati Agro कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत, कुणापुढे झुकणार नाही
VIDEO | बारामती अॅग्रो कारखान्यावर झालेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करून या झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देत कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी कुणापुढे झुकणार नाही, असे म्हटले आहे.
मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ | बारामती अॅग्रो कारखान्यावर झालेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करून असे म्हटले की, माझ्या कारखान्यावरील कारवाईबाबत शिंदे गटातील एका नेत्याने दिलेली माहिती इंटरेस्टींग आहे. या कारवाईमागे राज्यातील एका नेत्याबाबतचा अंदाज योग्य होता, पण दुसऱ्या नेत्याविषयी ऐकूण जरा आश्चर्यच वाटलं. केवळ राजकीय द्वेश या एकमेव कारणामुळं माझ्या कारखान्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला नाही तर याव्यतिरीक्तही अनेक कारणं आहेत. त्यामुळं भविष्यात ही केस लढायला शासनाकडून बड्या वकीलांची फौज उभी केली जाईल, जी सामान्य लोकांची बाजू मांडण्यासाठी कधीही उभी केली जात नाही. पण तरीही मी डगमगणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. पुढे ते असेही म्हटले की, कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी पूर्ण ताकदीनीशी लढेल. कुणापुढे झुकणार नाही, कारण माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.